शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (19:36 IST)

भोंदूबाबाकडून 4 महिलांवर अत्याचार

विवारमध्ये एका भोंदूबाबाने पैशाचे आमिष दाखवून 4 महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलांना भोंदूबाबाने आर्थिक गंडा देखील घातला आहे. त्याचबरोबर ‘जादूने संपूर्ण कुटुंबाला ठारकरेन’, अशी धमकी देत पीडित महिलांवर अनेकवेळा अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
विवार येथील रहिवासी असणार्या. एका 26 वर्षीय पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती अडचणीची होती. दरम्यान, जुलै महिन्यात पीडित महिलेच्या ओळखीचा दिनेश देवरुखकरने दिला मॅथ्यू पंडियनची माहिती दिली. तसेच तुझ्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील, असं सांगितलं. आरोपी दिनेशच्या सांगण्यावरून पीडित महिला भोंदूबाबाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. आरोपी पंडिययने पूजा करण्यासाठी तिच्याकडून 10 हजार रुपये घेतले. तर पूजा संपन्न झाल्यावर कोट्यावधी रुपयांचा पाऊस पडेल अशी माहिती दिली. धक्कादायक म्हणजे अरोपीनं पूजा करण्याच्या बहाण्याने पीडितेवर बलात्कार केला. याबाबत काही सांगितल्यास ‘जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन’ अशी धमकीही दिली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच पिडित 4 ही महिलांनी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात फर्याद दिली. यावरून भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.