सोमवार, 6 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:45 IST)

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर कायमस्वरूपी विद्युत रोषणाई

Permanent electric lighting on the statue of Balasaheb Thackeray Maharashtra News Mumbai Marathi News Webdunia Marathi
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर तसंच वाहतूक बेटावर महानगरपालिकेच्या ए विभागाच्या वतीने कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे शिवसेनाप्रमुखांचा पुतळा आणि वाहतूक बेटासह फोर्ट परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
 
यावेळी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं आणि विद्युत रोषणाईची पाहणी केली. एलईडी दिव्यांच्या झोतात उजळून निघालेला पुतळा, वाहतूक बेट पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.शिवसेनाप्रमुखांचा पुतळा आणि वाहतूक बेटावर विद्युत रोषणाई करण्यासाठी 50 वॅटच्या फ्लड लाईटसह 24 वॅटचे वॉल वॉशरचा ठिकठिकाणी उपयोग करण्यात आला आहे.