मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई : , गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (21:30 IST)

समीर वानखेडेंना मुंबई पोलिसांचे समन्स ?

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द समीर वानखेडे यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आपल्यावर काही पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्याच तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना समन्स पाठवले जाणार आहेत. त्याच तक्रारीचा भाग म्हणून समीर वानखेडेंची चौकशी केली जाईल.
 
मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ११ ऑक्टोबर रोजी माझी पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला होता. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसात याबाबत तक्रारदेखील केली होती. तसेच मुंबई पोलिसांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली होती. वानखेडे यांनी स्वत: त्याबाबतचे पुरावे पोलिसांना दिलेले आहेत. या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी दोन पोलिसांची चौकशीदेखील केली आहे. तसेच आता मुंबई पोलीस वानखेडे यांना समन्स पाठवणार आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
 
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केलं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी एनसीबीने ज्या दिवशी क्रूझ पार्टीवर कारवाई केली त्यादिवशी काही भाजप नेतेही त्यांच्यासोबत होते, असा दावा मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ देखील दाखवत त्याचे पुरावे दिले होते. त्यामुळेच वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का? असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसाता याबाबत तक्रारदेखील दाखल केली होती.
 
समीर वानखेडे यांच्या आईचं ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला त्या स्मशानभूमीत ते नेहमी जातात. ते २०१५ पासून तिथे जातात. या दरम्यान दोन संशयित व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांना सोमवारी (११ ऑक्टोबर) जाणवलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही काढले होते. त्यानंतर मुबंई पोलिसात तक्रार करत त्याचे सीसीटीव्ही फुटेज देत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा त्यांनी केला होता.