सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (11:52 IST)

मुंबईत भीषण अग्निकांडात, 20 बाईक जळून खाक

मुंबईच्या कुर्लापूर्व भागातील रेल्वे स्थानकाचा जवळच्या परिसरात बुधवारी भीषण आग लागली. नेहरूनगरमध्ये लागलेल्या आगीत 20 दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आग विझवली.आगीच्या झळा इमारतीच्या 8 व्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या.सुदैवाने या अग्निकांडात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.ही आग लावण्यात आली आहे अशी शक्यता रहिवाश्यानी वर्तवली आहे.
 
आगीच्या बातमीने परिसरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 20 बाईक पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.पोलीस घटनेचा तपास करत आहे.