शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (16:07 IST)

NCB च्या वानखेडेंमागे पोलीस गुप्तहेर? पोलिस महासंचालकांकडे तक्रार

क्रूझवरच्या रेव्ह पार्टीवर छापा मारत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडण्यात आले होते. राज्याचे मंत्री नवाब मलिक  यांनी आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला अटक करण्यात आली. त्यांचे लक्ष शाहरुख असल्याचा आरोप केला होता. त्यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप सुरु झाले आहेत.  एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडे  यांनी साध्या वेशातील दोन पोलीस आपल्यावर पळत ठेवत असल्याची तक्रार केली. ही तक्रार महाराष्ट्राचे डीजीपी यांच्याकडे तोंडी केली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. वानखेडे यांच्या आईचे 2015 मध्ये निधन झाले. तेव्हापासून ते रोज या ठिकाणी जातात. ओशिवारा पोलिसांनी वानखेडे यांची या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली आहे.
 
क्रूझवरील पार्टीत आर्यन खान सापडल्याने ही हाय प्रोफाईल केस बनली आहे. एनसीबीची टीम समीर वानखेडे  यांच्या नेतृत्वात काम करत आहे. सहा महिन्यात एनसीबीला चार्जशीट फाईल करायची आहे. यामुळे वानखेडेंचा य़ेथील सेवा कालावधी सहा महिन्यांनी वाढविला आहे. त्यांना दुसऱ्यांदा एक्स्टेंशन मिळाले आहे. गेल्या वर्षीच वानखेडे यांना डीआरआयहून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली करण्यात आली होती. वानखेडेंनी दोन वर्षात 17 हजार कोटींचे ड्रग्ज आणि रॅकेट समीर वानखेडेंनी  पकडली आहेत.