सहायक वनसरक्षक अधिकारी 5.30 लाखाची लाच घेताना पकडले ; कार्यालयातच सापडलं मोठं ‘घबाड’
सरकारी काम मिळविण्यासाठी तसेच केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी सरकारी अधिकार्यांना लाच द्यावी लागते, अशी आजवर आपली समजूत होते. पण, त्याही पेक्षा धक्कादायक कारभार वन विभागात सुरु असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत आढळून आले आहे. चक्क जिल्हा नियोजन समितीकडून कामे करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी अधिकार्यांकडे निधी मिळण्याअगोदरच ५ टक्के लाच मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत उघड झाला असून एका अधिकार्यानी दिलेल्या तक्रारीवरुन एसीबीने सापळा रचून तब्बल ५ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना सहायक वनसरंक्षक अधिकार्याला रंगेहाथ पकडले. सापळा कारवाईनंतर कार्यालयाची झडती घेतली असता तेथे १२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली असून एसीबीने ती जप्त केली आहे.
बळीराम तुकाराम कोळेकर (वय ५७) असे या सहायक वनसरंक्षक वर्ग १ अधिकार्याचे नाव आहे.याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ३००/२१) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या यातील तक्रारदार हे वन परीक्षेत्र अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
तसेच आरोपी हे त्यांच्याच कार्यालयातील सहायक वनसरंक्षक मुरबाड (Murbad) व ठाणे येथे वरिष्ठ अधिकारी आहेत. आरोपी यांनी २०२० -२१ मध्ये रोपवाटिका संदर्भात तक्रारदार यांना प्राप्त झालेल्या १८ लाख रुपयांच्या निधीमधील ५टक्के प्रमाणे ९२ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तसेच तक्रारदार यांनीत्यांच्या कार्यक्षेत्रातील जंगलाचे सरंक्षण, रोपाची लागवड व इतर कामे या करीता २००२ -२१ व २०२१ -२२ या दोन आर्थिक वर्षातील १ कोटी ६ लाख २४ हजार रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेला नसल्यानेआरोपी व त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे वारंवार मागणी केली होती. तेव्हा आरोपीने तक्रारदार यांना हा निधी प्राप्त होण्याकरीता ५ टक्के रक्कम ५ लाख ३० हजार रुपये जिल्हा नियोजन अधिकारी खंदारे यांना द्यावे लागतील असे सांगून लाचेच्या मागणीचा तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता.
तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात ६ सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार २० सप्टेंबर, ५ व ७ ऑक्टोबर रोजी तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन पडताळणी केली असता़ आरोपीने तक्रारदार यांच्याकडे ९२ हजार व ५ लाख ३० हजार रुपयांच्या रक्कमेची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी बळीराम कोळेकर याच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. कार्यालयातच कारवाई केल्यानंतर तेथे झडती घेण्यात आली.तेव्हा कार्यालयात तब्बल १२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे.