सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (11:18 IST)

Shiv Sena Dussehra Melava 2021 :शिवसेनेच्या दसरा मेळावा,चे ठिकाण ठरले,यंदाचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही -संजय राऊत

यंदाचा दसरा मेळावा होणार आहे.हे ठरले आहे. दर वर्षी  हा मेळावा मुंबईतील दादर मधील शिवाजी पार्कात भरतो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाला बघता.हा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी मांटुगातील षण्मुखानंद हॉल मध्ये होणार आहे. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. यंदाचा मेळावा ऑनलाईन नसून नियमांचे काटेकोर पालन करून आयोजित केले जाणार आहे. शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दसरा मेळावा आयोजित होणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.