गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (10:49 IST)

विवाहितेचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्तांनी चोपून काढले,तरुण पोलिसांच्या ताब्यात

MNS activists beat up a young man who blackmailed a pornographic video of a married woman
वसईत एका तरुणाने एका विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात घेऊन तिचे अश्लील व्हिडीओ काढून त्या व्हिडीओ सामायिक करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले आहे आणि या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.मुंबईच्या वसई-नायगाव रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे.मनोज थोरात असे या तरुणाचे नाव असून तो मुंबईच्या चुनाभट्टी येथील रहिवासी आहे.तर सादर महिला त्या तरुणाला  कंटाळून मुंबईहून वसई नायगाव येथे कुटुंबाच्या सोबत राहण्यासाठी आली होती. मात्र नायगावमध्ये येऊनही तरुणाचे तिला त्रास देणे सुरुच होते.
 
 
मनोजचे एका विवाहित महिलेशी प्रेम संबंध होते.पण तरुण काही महिन्यापासून महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून तिला शारीरिक मानसिक त्रास द्यायचा आणि व्हिडीओ सामायिक करण्याची धमकी द्यायचा.त्याच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेले मनसेच्या पदाधिकारी प्रफुल कदम यांच्याकडे तक्रार केली. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्षांनी  अविनाश जाधव,विरार वसई शहराध्यक्ष प्रवीण भोईर, माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांना या प्रकरणाची माहिती देऊन मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाचा पाठलाग करत त्याला पकडले आणि नायगाव रेल्वे स्थानक परिसरात बेदम चोपले नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.