बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (09:55 IST)

धक्कादायक ! ट्रेन मध्ये दारोडेखोरांनी तरुणीवर बलात्कार केला,दोघांना अटक केले

ट्रेनच्या प्रवासा दरम्यान एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लखनौ -मुंबई पुष्पक एक्स्प्रेस मध्ये इगतपुरी कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. या प्रकरणात दोघांना रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अटक केले आहे.
 
शुक्रवारी लखनौ -मुंबई पुष्पक एक्स्प्रेस मध्ये रात्री आठ च्या सुमारास 7 -8 दरोडेखोर शिरले आणि त्यांनी प्रवाशांना लुटले. नंतर ट्रेन मध्ये या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले. काही प्रवाशांनी दरोडेखोरांना पकडून ठेवले आणि कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्याण जीआरपी ने या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे.