Last Modified रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (11:38 IST)
आयकर विभागाने
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवारच्या मुंबई कार्यालयावर छापा टाकला
. पार्थ यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट्स येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. त्या पूर्वी आयकर विभागाने
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावर छापा टाकला होता. अजित पवार यांची एक बहीण कोल्हापुरात तर इतर दोघ्या बहिणी पुण्यात राहतात. आता आयकर विभागाने त्यांच्या मुलाच्या मुंबईतील कार्यालयावर छापा घातला आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्या काही निकटवर्तीयांचा साखर कारखान्यात देखील छापे टाकण्यात आले आहे.
या संदर्भात उपमुख्य मंत्री म्हणाले की, आयकर विभागाला कोणावरही छापे घालण्याचा अधिकार आहे.त्यांना कोणावर संशय आल्यावर ते छापा घालू शकतात.मी नियमितपणे कर भरतो.कोणता कर कसा भरावा ह्याची मला जाणीव आहे. माझ्या कंपन्यांचा वेळीच कर भरला जातो.पण आयकर विभागाला राजकीय कारणास्तव अजून कोणती माहिती पाहिजे ही फक्त आयकरची माहिती आहे.