शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:14 IST)

कळव्यात NCP शिवसेना अमोर समोर : राष्ट्रवादीचे बॅनर फाडण्यात आले, आव्हाडांनी इशारा दिला

कळव्यात शनिवारी लसीकरण मोहीम राबविण्यात येतं आहे.त्या साठी राष्ट्रवादी कडून लसीकरणाचे बॅनर लावण्यात आले आहे.ते बॅनर रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी फाडून टाकण्याचे वृत्त मिळाले आहे. या संदर्भात स्वतः दखल घेऊन राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून पोलिसांना याची दखल घेऊन अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पकडण्यास सांगितले.अन्यथा पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतील अशा इशारा देण्यात आला आहे. या मुद्या वरून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी लसीकरणावरून शिवसेना आणि पालिका प्रशासनावर टीका केली आहे. ह्याचा वर आव्हाड यांनी ट्विट करून अज्ञात गुंडाना पकडण्याची मागणी केली आहे. सध्या इथे लसीकरण मोहीम राबविली जात आहे आणि त्यात सहभागी होण्याचे आवाहन आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे 

राष्ट्रवादीचे ठाण्याचे शहराध्यक्षआनंद परांजपे  यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना 24 तासात अटक करावी अन्यथा पोलीस ठाण्याचा घेराव करण्यात येईल असा इशारा दिला आहे. लसीकरण मोहीम महापालिकेची आहे त्यासाठी शिवसेनेने बॅनर का लावले आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.लसीकरण मोहीम राबविण्यासाठी लसींचा साठा महापालिकेकडून दिला जातो. त्यामुळे त्याचे श्रेय महाविकास आघाडीचे आहे.शिवसेनेचे नाही असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात ही मोहीम राबवली जात असून त्यासाठी पक्षाचे बॅनर लावले गेले. शिवसेनेचे मोहीम नसल्याने त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावू नये.