शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (11:25 IST)

नात्याला काळिमा : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून लैंगिक अत्याचार

कल्याणमध्ये नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 14 वर्षीयअल्पवयीन मुलीवर तिच्या एका नातेवाईकाकडून बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. या मध्ये धक्कादायक गोष्ट अशी की या नराधमाने पीडितेवर सात वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार केला होता.या घटनेमुळे ती मुलगी मानसिक दबावा खाली गेली होती. ती कोणाशी जास्त बोलत नसे.आपल्या विचारातच राहायची.तिची अवस्था बघून तिच्या मोठ्या बहिणीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असताना तिने तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. तिने जे काही सांगितले ते ऐकल्यावर कुटुंबीय हादरले मुलीने सांगितल्याप्रमाणे 7 वर्षा पूर्वी मुलीच्या एका 64 वर्षीय नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केला.तिला या घटनेचा धक्का बसला आणि ती मानसिक दबावा खाली गेली. बहिणीने तिला मोकळे केल्यावर तिने सर्व घडलेले सांगितले. हे ऐकतातच कुटुंबीयांनी कल्याणच्या पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी त्या नराधमाला अटक करून त्याच्या कडून कसून चौकशी घेत आहे.