गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (11:00 IST)

Road Accident : मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघातात सहा गाड्यांची धडक, तीन मृत्युमुखी

पुणे -मुंबई महामार्गावर खोपोली येथे विचित्र अपघात झाला असून या अपघातात बोरघाटात सहा गाड्यांची धडक होऊन त्या एकमेकांवर आदळल्या गेल्याचे वृत्त मिळाले आहे. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

हा अपघात सकाळी सहाच्या सुमारास खोपोली येथे झाला या भीषण अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांमध्ये येऊन अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मुंबईकडून येणाऱ्या एका टेंपोची बस ला धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने एक टेंपो कोंबड्याना घेऊन येत होते.या टेंपो ने बस ला धडक दिली आणि टेंपोच्या चालकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मागील येणारे वाहन एकमेकांवर आदळले अपघातात जखमी झालेल्यांना बचाव पथकाने घटनास्थळी  दाखल होऊन जवळील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात तीन जण मृत्युमुखी झाल्याचे वृत्त मिळाले आहे.