1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (18:50 IST)

मुंबई विमानतळावर जप्त केले चार कोटींचे हेरॉईन

मुंबई विमानतळ परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. एनसीबीने गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली, हे हेरॉईन असल्याची माहिती आहे. ४ कोटी रुपये ज्याची किंमत आहे. याबाबत एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
 
मंगळवारी (२ नोव्हेंबर) देखील एनसीबीने विलेपार्ले परिसरात मोठी कारवाई केली होती. एनसीबीने कोट्यावधी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.