मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (16:52 IST)

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार? कोर्टात सोमवारी सुनावणी

बैलगाडी शर्यत घेण्यावर घातलेली बंदी उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. 
 
या सुनावणीत बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली नाही तर महाराष्ट्र सरकार सरकारने अद्यादेश काढून शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणी बैलगाडा संघटना आणि शेतकऱ्यांतून होत आहे.
 
राज्यातील विविध भागांत दिवाळीदरम्यान बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात येते. मात्र, मुंबई हायकोर्टाने 2017 मध्ये शर्यतींवर बंदी घातली. या शर्यतीचं गावोगावी जत्रांमध्ये आयोजन करण्यात येत असे आता तसे होत नाही. 
 
बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवावी, अशी मागणी शर्यतप्रेमींकडून केली जात आहे मात्र कोर्टात याबाबतची याचिका प्रलंबित असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आता सरकारने अद्यादेश काढून शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
 
बैलगाडा शर्यती प्रकरणी सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने याचिका दाखल केली असून या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत महाराष्ट्र सरकारने ही याचिका दाखल केली आहे. येत्या सोमवारी ही सुनावणी होणार आहे.