संबंधित माहिती
- ४८ तासांत बिनशर्त माफी मागावी, अमृता फडणवीस यांची नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस
- गाढ झोपेत असताना जळगावात दोन मजली इमारत कोसळली; ७ लोक थोडक्यात बचावले
- यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल
- नवाब मलिकांच्या जावयाने पाठवली फडणवीसांना नोटीस, बिनशर्त माफीची मागणी
- शिकाऊ डॉक्टरची हत्या, यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये खळबळ
पत्नीच्या आत्महत्येच्या धक्क्याने पतीनेही घेतला गळफास
हिंगोलीत पत्नीच्या आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काजल घोघरे व सोनू घोघरे असे आत्महत्या केलेल्या या जोडप्यांची नावे आहेत.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वर्षभरापूर्वीच काजल घोघरे व सोनू घोघरे यांचा विवाह सोहळा पार पडला होता. सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना अचानक त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला होता. नंतर काजलने स्वतःला गळफास लावून घेतला. नंतर पत्नीच्या मृत्यूने धक्का बसलेल्या पती दुसर्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी बाळापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
