गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतुकीवर परिणाम

चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम  झाला आहे. पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक यामुळे खोळंबली आहे. तब्बल एक तास उशीराने वाहतूक सुरू आहे. सकाळी 6.20  मिनिटांनी ही घटना लक्षात आल्यानंतर अनेक एक्सप्रेस तात्काळ थांबवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, यामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्सप्रेस या बिघाडामुळे खोळंबल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र वाहतूक पूर्वपदावर येण्यास किती वेळ लागेल याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.