गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 18 मार्च 2023 (21:47 IST)

चित्रा यांनी केला नाशिक ते मालेगाव असा बसमधून प्रवास, मानले फडणवीसांचे आभार

chitra wagh
राज्य सरकारने एसटी प्रवासात महिलांना 50टक्के सवलत दिली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी  नाशिक ते मालेगाव असा बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महिला सहकारी होत्या. या सर्व प्रकाराची माहिती वाघ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
 
वाघ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस… श्रींच्या #पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र #लालपरी च्या प्रवसात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली.
 
सकाळी नाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह ST ने प्रवास सुरू केला.. तिकिटावर सवलतीची रक्कम पाहून खात्री पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली. त्यांना होणारा फायदा सांगताना चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.
 
महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या ‘लालपरी सशक्त नारी’ योजनेसाठी मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे मातृशक्ती तर्फे मनःपूर्वक आभार असे म्हटले आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor