बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (10:40 IST)

Cinema Hall Guidelines: राज्यात चित्रपट गृहे, नाट्यगृहे उघडण्यासाठीची नियमावली जाणून घ्या

केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत जारी केलेल्या नियमावली संदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज मंगळवारी दिली. नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपट, नाट्यगृहांसाठी चांगला हंगाम असतो. यासंदर्भात आम्ही सकारात्मक असून, लकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असे ते म्हणाले.येत्या 22 ऑक्टोबर पासून उघडणार असून त्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करून घेतला आहे. चित्रपट गृहे येत्या 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. आणि त्यासाठी काही नियमावली जारी केली आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्याच्या विरोधात कारवाई केली जाईल असे ही सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊ या काय आहे नियमावली.  
 
अशी आहे नियमावली : -
*  केवळ 50 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती.
 * बसताना सामाजिक अंतर राखणे  बंधनकारक.
 * आसनव्यवस्था राखीव असू नये. 
*  प्रेक्षकांना सॅनिटायझर पुरवणार. 
*  आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर आवश्यक. 
*  लक्षण नसलेल्या लोकांनाच प्रवेश.
* प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह सुरु होणार नाही.तशी परवानगी नाही.
* जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घ्यावा.
* मास्क आणि सेनेटाईझरचा वापर करणे बंधनकारक.
* कलाकार आणि इतर कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करणे बंधनकारक.
* कलाकाराचे मेकअप करणाऱ्यांना पीपीई किट घालणे बंधनकारक.
* प्रेक्षकांनी लसीचे दोनी डोस घेणे बंधनकारक.