बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (08:25 IST)

तरुणीला अडवून सिनेस्टाईल किस…. दुस-याने केले कॅमे-यात कैद

जळगावमध्ये लग्नास नकार देणा-या नात्यातील तरुणीला रस्त्यातच अडवून मिठीत घेवून तिचे चुंबन घेण्याचा प्रकार जळगाव शहरात घडला. या क्षणाला कॅमे-यात कैद करणाच्या तयारीत असलेल्या त्याच्या मित्राने लागलीच या क्षणाचे फोटोसेशन केले.
 
मेहरुण उद्यानात घडलेल्या या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा तरुणांविरोधात विनयभंग तसेच पोस्को कायद्यांतर्गत रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबार येथे राहणा-या तरुणाच्या मामाची मुलगी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत राहते. ती अल्पवयीन असून बारावीत शिकते. तिच्यावर तिच्या आतेभावाचे प्रेम जडले आहे. त्याने तिच्याजवळ प्रेमाचा आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र मुलीचे वय कमी असून आम्हाला तुमच्याकडे मुलगी द्यायची नाही असे मुलीच्या कुटूंबीयांनी मुलाच्या कुटूंबीयांना सांगीतले होते.
 
मात्र प्रेमात दिवाना झालेला तो तरुण तिचा पिच्छा सोडण्यास तयारच नव्हता. त्याने मित्राला सोबत घेवून नंदुरबार येथून जळगाव गाठले. मुलीची मेहरुण उद्यानात भेट घेतांना त्याने तिला थेट मिठीत घेत तिचे चुंबन घेण्याचा प्रकार केला. दरम्यान तयारीत असलेल्या त्याच्या मित्राने या क्षणाला त्याच्या ताब्यातील मोबाईल कॅंमे-यात कैद केले.हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या आईवडीलांनी धाव घेत मुलीला त्याच्या तावडीतून सोडवले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा तरुणांविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.