मंगळवार, 8 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (12:24 IST)

वाशिममध्ये दोन समुदायांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू तर चार जणांना अटक

pitai
महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यामध्ये दोन समुदायांमध्ये वाद झाला व वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. ज्यामध्ये एकाच मृत्यू झालेला आहे. तर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कारंजा तहसील मधील शिंगणापूर गावामध्ये पारधी समाज आणि मुस्लिम समाजाच्या गटात एक आक्टोंबरला संध्याकाळी वाद झाला व या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे.   

मृताच्या भावाने पोलिसांत तक्रार केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मृतकच्या  कुटुंबीयांनी अकोला आणि कारंजा महामार्गावर रस्ता रोखुन धरला व मागणी केली की, जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन समुदायांमध्ये दगडफेक झाली.   

Edited By- Dhanashri Naik