आज बारावीचा निकाल जाहीर होणार
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी (HSC) निकाल २०२६ आज शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
बारावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावी (HSC) निकाल आज २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. तसेच निकाल जाहीर होण्याची वेळ दुपारी १:०० वाजता आहे.
अधिकृत वेबसाइट्स जिथे निकाल पाहता येईल.
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
निकाल कसा पाहावा?
तुम्हाला सीट नंबर आणि आईचे नाव (Mother's first name) लागेल. निकाल आल्यानंतर मार्कशीट डाउनलोड करता येईल.
काही विद्यार्थी/पालकांना निकालाच्या दिवशी वेबसाइट्सवर खूप ट्रॅफिक असल्याने लोड होण्यास वेळ लागू शकतो.
निकाल पाहिल्यानंतर त्याची एक डिजिटल कॉपी (PDF) सेव्ह करा किंवा शक्य असल्यास प्रिंट काढून ठेवा.
जर तुम्हाला तुमच्या गुणांबद्दल शंका असेल, तर बोर्डाकडून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याबद्दलच्या तारखा बोर्डाकडून लवकरच जाहीर केल्या जातील.
ALSO READ: विदर्भ तापला; तापमान ४४°C पर्यंत पोहचले, भारतीय हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी इशारा
Edited By- Dhanashri Naik