मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (08:30 IST)

नवरात्र, दसरा सण देखील साधेपणाने साजरे करा : मुख्यमंत्री

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र आणि दसरा सण देखील साधेपणाने साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे. याबाबत परीपत्रकही काढण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दसरा साधेपणाने साजरे करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव देखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. नागरिकांनी सामाजिक भान राखत शांततेने गणेशोत्सव साजरा केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच आवाहन त्यांनी नवरात्री आणि दसरा सणादरम्यान ही केले आहे.