गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:11 IST)

ऑपरेशननंतर मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण फोटो प्रथमच आला समोर

uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानेच्या शस्त्रक्रियेनंतर प्रथमच फोटो समोर आला आहे. निमित्त होते ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे. याच जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी नेताजी व बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. वर्षा बंगल्यावर झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचा फोटो समोर आला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत फि
ट असल्याचे दिसून येत आहे.
 
साधारण अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सध्या विश्रांती व उपचार घेत होते. याचदरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ बैठक, राज्य टास्क फोर्स बैठकीसह अन्य महत्त्वाच्या बैठकांना व कार्यक्रमांना ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. त्यात मुख्यमंत्र्यांचा ऑनलाई बोलतानाचा फोटोच समोर आला होता. आतापर्यंत त्यांचा संपूर्ण फोटो जाहीर झालेला नव्हता. मात्र, आजा बाळासाहेब आणि नेताजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा संपूर्ण फोटो सर्वांसमोर आला आहे. त्यात त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून येत आहे.
 
विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्ब्येतीवरुन चांगलीच टीका गेल्या काही दिवसांपासून केली आहे. मुख्यमंत्रीपदाचा पदभार तात्पुरता कुणाकडे तरी द्यावा, रश्मी ठाकरे यांना संधी द्यावी या आणि अशा कितीतरी टीका करण्यात आल्या आहेत. मात्र, आता मुख्यमंत्र्यांचा पूर्ण फोटो समोर आल्याने सर्व चर्चा आणि अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.