राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार, अलर्ट जारी
महाराष्ट्रात हिवाळ्याने पुन्हा एकदा तीव्र हजेरी लावली असून, मुंबईसह राज्यात गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमान मोठ्या प्रमाणात घसरणार आहे.
विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना 10 ते12 डिसेंबर या कालावधीत तीव्र शीतलहरीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येणारे 48 तास अतिशय धोकादायक असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान खात्यानुसार, विदर्भ आणि मराठवाडा विभागात तीव्र थंडीची लाट येणार असून तापमानात घट होणार. संपूर्ण राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस घरणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, सातारा या जिल्ह्यात शीतलहर वाढणार आहे. वाढत्या शीतलहरमुळे जनजीवन विस्कळीत होऊन आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तसेच हवामान विभागाने वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना सावधगिरी बाळगण्याचा विशेष सल्ला दिला आहे. राज्यातील येत्या 48 तासांत या भागांत शीतलहरचा जोर वाढेल. किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी या काळात घराबाहेर अनावश्यक फिरणे रात्रीचा प्रवास, शेतात दीर्घकाळी राहणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
Edited By - Priya Dixit