शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2024 (09:54 IST)

पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली

Cold wave
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. रात्रीच्या तापमानात प्रचंड घसरण झाल्याने जळगावकरांना हुडहुडी भरली आहे. २२ जानेवारी रोजी जळगावात किमान तापमानाचा पारा ९ अंशावर तर कमाल तापमानाचा पारा २९ अंश सेल्सिअस होता. तर आज मंगळवारी रात्री तापमानाचा पारा ८ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
सध्या अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. यात धुळ्याचा पारा यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर पोहोचली असून ६.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या तापमानातील सर्वात नीचांकी तापमानाची म्हणून नोंद करण्यात आली आहे.
 
जळगावात मागील काही दिवसापासून किमान तापमानाचा पारा १० अंशावर होता. रात्री आणि पहाटच्या वेळी थंडीचा जाणवत होती. मात्र सोमवारी ९ अंशावर आल्याने हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत होती. आज रात्री पारा ८ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच दिवसाचे तापमान ३० अंशावर असणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
 
२८ जानेवारीपर्यंत हा पारा ३० ते ३१ अंशावर असणार आहे. सध्या पहाटच्या वेळेस जळगाव शहरात सर्वत्र धुक्याची चादर बघायला मिळाली. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये देखील घट होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, सध्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना या मोठा फायदा होणार आहे.