बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2024 (09:00 IST)

बुलढाणा हादरलं! सासऱ्याने कुऱ्हाडने गर्भवती सून आणि नातवाची हत्या केली

बुलढाणा - वयोवृद्ध सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेची व नातवाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी आदिवासीबहुल संग्रामपूर येथे घडली. यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. 
 
याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून घटनेचा तपशील कळू शकला नाही. प्राथमिक माहितीनुसार संग्रामपूर शहरात मंगळवारी 65 वर्षीय आरोपी नारायण गायकीने राहत्या घरातच आपल्या गर्भवती सून अश्विनी देवानंद गायकी व नातू समर्थ गायकी यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामुळे 8 वर्षीय नातू जागीच ठार झाला. सून गंभीररीत्या जखमी झाली असता तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे अश्विनी ह्या गर्भवती होत्या. 
 
आरोपी नारायण गायकीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास केला जात आहे. दरम्यान अशी भयकंर घटना घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.