सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2024 (17:27 IST)

जरांगे आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार

manoj jarange
आज संपूर्ण देश राममय झाले आहेत. आज राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात असून देशभरातील अनेक मंदिरांमध्ये विविध आयोजन केले जात आहे. अयोध्येत श्री राम विराजमान झाले आहेत. अशात मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अयोध्येला राम दर्शनासाठी जाणार असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
 
जरांगे पाटील यांनी नगरमधील राम मंदिरात दर्शन घेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, नगरमध्ये प्रभू श्रीरामाची पूजा करुन आशीर्वाद घेतले. हा दिवस खूप आनंदाचा आहे. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस खास आहे. त्यांनी म्हटले की हिंदू धर्माचा गर्व आणि स्वाभिमान आहे. आता प्रभू श्रीरामाकडे आरक्षणासाठी साकडं घालू. ते म्हणाले की आरक्षण मिळाल्यावर अयोध्येला नक्की दर्शनाला जाणार.