1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2024 (15:13 IST)

गडचिरोली: वैनगंगा नदीत नाव उलटली, 6 महिला बुडाल्या

water death
गडचिरोली : वैनगंगा नदीत मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने 6 महिला बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी अकारा वाजेच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली. बुडलेल्या सहा महिलांपैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला तर पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
 
या महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव वैनगंगा नदीपात्रातातून जात होती मात्र मधोमध नाव उलटली आणि त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या.
 
या घटनेनंतर नावाडी पाण्याबाहेर पोहून आला आणि त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. नंतर तिचे प्रेत आढळले असून उर्वरित 5 महिलांना शोधण्याचे काम सुरु आहे.