शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (12:08 IST)

ठाण्यात 11 महिन्यांनंतर कॉलेज उघडले

कोव्हिड-19 साथीच्या आजरामुळे मागील 11 महिन्यांपासून बंद महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कॉलेज सोमवारपासून उघडले. कलेक्टर राजेश नारवेकर यांनी रविवारी एक आदेश जारी करत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कॉलेज उघडण्याची परवानगी दिली.
 
आदेशाप्रमाणे एका दिवसात केवळ 50 टक्के उपस्थितिची परवानगी आहे आणि शैक्षणिक संस्थानांना कोव्हिड-19 संबंधी सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
 
कलेक्टर यांच्याप्रमाणे नियम न पाळणार्‍या कॉलेजांविरुद्ध कारवाई केली जाईल. त्याचबरोबर संबंधित महानगरपालिकांचे मार्गदर्शक सूचना शहरी भागात येणार्‍या महाविद्यालयांनाही लागू होतील.
 
ठाण्यात रविवारी कोव्हिड-19 चे 354 नवीन प्रकरणं समोर आले होते ज्यानंतर जिल्ह्यात एकूण संक्रमितांची संख्या वाढून 2,57,745 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6,202 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.