गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:41 IST)

मनसेच्या दणक्यानंतर अ‍ॅमेझॉनकडून मराठी भाषेत सेवा सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अ‍ॅमेझॉनला मराठी भाषेमध्ये सेवा सुरू करण्यासंदर्भात इशारा दिला होता. मनसेच्या दणक्यानंतर आता अ‍ॅमेझॉननं आपल्या रिजनल नेटवर्कचा विस्तार करत मराठी भाषेत आपली सेवा सुरू केली आहे. सध्या विक्रेते मराठी भाषेचा वापर करू शकतात असं अ‍ॅमेझॉनकडून सांगण्यात आलं आहे. "मराठी भाषेत सेवा सुरू केल्यानं ई कॉमर्सद्वारे लाभ घेण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील लाखो व्यवसायिक, एमएसएमई, स्थानिक दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांना येणारा भाषेचा अडथळा आता दूर होईल," असं कंपनीनं म्हटलं आहे.
 
अ‍ॅमेझॉन सध्या महाराष्ट्रातील ८५ हजारांपेक्षा अधिक विक्रेत्यांची नोंदणी आहे. अशातच मराठी भाषेत नोंदणी करुन आपलं खात सुरू करण्याच्या मिळालेल्या सुविधेमुळे महाराष्ट्रातील अनेक शहरं म्हणजेच कोल्हापूर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, जळगाव या ठिकाणच्या लाखो विक्रेत्यांचा या सेवेचा लाभ घेता येईल. या नव्या सुविधेमुळे विक्रेत्यांना नोंदणी करण्यापासून, ऑर्डर मॅनेज करणं, इन्वेन्ट्री मॅनेज करणं अशी अनेक कामं मराठी भाषेतच करता येतील. वेबसाईटसोबतच मोबाईलवरील अॅपमध्येही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉननं मराठी भाषेत ट्युटोरियलदेखील उपलब्ध करून दिले आहेत.