नातं कसं असावं

relationship
Last Modified शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (15:42 IST)
नातं सन्मानित करणारे असावे
अपमानित करणारे नसावे

नातं प्रेरणा देणारे असावे
वेदना देणारे नसावे
नातं बळ देणारे असावे
घाव देणारे नसावे

नातं साथ देणारे असावे
स्वार्थ पाहणारे नसावे

नातं सुखावणारे असावे
मन दुखावणारे नसावे

नातं बदल घडवणारे असावे
बदला घेणारे नसावे

नातं समज देणारे असावे
गैरसमज वाढवणारे नसावे

नातं कौतुकास्पद असावे
संशयास्पद नसावे

नातं विश्वसनीय असावे
प्रशंसनीय नसावे

नातं खोडकर असावे
बंडखोर नसावे

नात्यात वाद असावा
राग नसावा

नात्यात परखडपणा असावा
परकेपणा नसावा

नात्यात प्रामाणिकपणाला वाव असावा
आविर्भाव नसावा

नात्यात उपकार असावा
अहंकार नसावा

नात्यात मोकळीक असावी
देख-रेख नसावी

नात्यात मर्यादा असावी
बांधिलकी नसावी

नात्यात परिचय असावा
संशय नसावा

नात्यात चिडवणे असावे
फसवणे नसावे

नात्यात रूसणे असावे
नात्यात उसणे नसावे

नात्यात विचारपूस असावी
चौकशी नसावी

नात्यात तृष्णा असावी
वासना नसावी

नात्यात ओढ असावी
नको ती खोड नसावी

नातं समाधानकारक असावे
बंधनकारक नसावे

नातं उपायकारक असावे
अपायकारक नसावे

नातं शोभनीय असावे
उल्लेखनीय नसावे

नातं म्हणजे संवाद
नसे ते अपवाद

नात्यात असे शब्दांना जाग
भासे आठवणींचा भाग

नातं म्हणजे तात्पुरता सहवास नसावा
आयुष्यभराचा प्रवास असावा

नात्यांमुळे जीवनाला अर्थ
नात्यांविना सारं काही व्यर्थ

-सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

देत चला तुम्ही जे जे आहे कमावलं!

देत चला तुम्ही जे जे आहे कमावलं!
आयुष्याच्या शाळेत एक धडा मिळतो, तोच धडा आयुष्याचे सारे सार शिकवितो,

जर तुमचा पार्टनर तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर या टिप्स ...

जर तुमचा पार्टनर तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर या टिप्स फॉलो करा
नात्यात भांडणाचाही काळ येतो जिथे तुमचे नाते अतिशय नाजूक परिस्थितीतून जाते. या स्थितीत ...

गलिच्छ योगा मॅट्स स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या

गलिच्छ योगा मॅट्स स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने करणे खूप गरजेचे आहे. तसेच आजकाल योगा करताना मॅटचा वापर ...

Beauty Tips : चेहऱ्यावर म्हातारपण लवकर दिसणार ...

Beauty Tips : चेहऱ्यावर म्हातारपण लवकर दिसणार नाही,तज्ज्ञांनी सांगितलेले हे 5 सौंदर्य मंत्र पाळा
आरोग्याची जशी विशेष काळजी घेतली जाते, तशीच त्वचेचीही काळजी घेतली पाहिजे.वेळेवर साफसफाई ...

Career Tips : व्हेटर्नरी डॉक्टर कोर्स करून पशुवैद्यकीय ...

Career Tips : व्हेटर्नरी डॉक्टर कोर्स करून पशुवैद्यकीय डॉक्टर व्हा
प्रत्येकाला प्राण्यांची ओढ असते एखाद्याला कमी तर एखाद्याला जास्त असते. आपल्याला देखील जर ...