शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (14:54 IST)

मराठी कविता : संसार

Marathi Kavita
सूर मिळता सुरात तुझ्या
बनले जीवन गाणे
सात सूर हे जुळवित गेले
सरस बनले जीवन माझे
ह्या सुरातुन दोन सूर निर्मिले
ही दोन माझी छोटी बाळे
त्यांच्या सुरात रमत गेले
सुमधुर बनले गीत माझे
हे माझे गीत तू ऐकावे
अति प्रेमाने
साथ तुझी, घेऊनी हे
गीत बनावे कोरस रे
हाथ तुझा हाती घेऊनी
चालीन जीवन वाट रे
तुझ्या सुरात देऊनी सूर माझे
गाईन हे जीवन गाणे
प्रकाश माझ्या जीवनात करी
देऊनी साथ माझी रे
निरोप द्या मला ‍अति प्रेमाने
सार्थक करी माझे जीवन गाणे.
सौ. स्वाती दांडेकर