असावी मर्यादेत गोष्ट प्रत्येकच
असावी मर्यादेत गोष्ट प्रत्येकच,
संयम हा जीवनात आवश्यकच,
गोष्टी सगळ्या भरकटत जातील,
दिशाहीन होऊन सर्वच पांगतील,
कुठंतरी असावा अंकुश ह्यावर,
मनाला घालावा प्रत्येकानं आवर,
ठेवावं न स्वप्न उराशी बाळगून !
पण किंमत काय मोजतोय हे उमगून!
आपल्या स्वप्न पुर्ती साठी खांदा दुसऱ्याचा का?
आनंद आपला होतो, बळी इतरांचा असावा का?
नकोच असं सुख ही यायला वाटेला,
संयम, अन मर्यादा हवीच बाळगता यायला.!
....अश्विनी थत्ते.