शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (10:36 IST)

कमी गुणांच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

कालच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या काळानंतर तब्बल दोन वर्षाने यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळतील या भीतीने सोलापूर टेम्भूर्णी च्या माढा तालुक्यात घोटी येथे एका विद्यार्थिनीने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर निकालात तिला 81 टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाल्याचं समजलं .अमृता दाजीराम लोंढे(17) असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. अमृताने या वर्षी एप्रिल मध्ये दहावीची परीक्षा दिली असून परीक्षेत कमी गुण  मिळण्याची भीती तिला सतावत होती. त्यामुळे ती सतत तणावाखाली होती आणि कमी गुण  मिळण्याची भीती तिला सतावत होती. तिचा आईवडिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर तिने असे टोकाचे पाऊल उचलले.ती  गुरुवारी मध्यरात्री घरातूनन सांगता ती निघाली आणि शेततळ्यांत तिने उडी घेतली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि शुक्रवारी तिचा मृतदेह घरापासून दूर शेतल्यात आढळून आला. पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची टेम्भूर्णी पोलीस ठाण्यात नोंद केली. काल निकाल जाहीर झाल्यावर तिला  दहावीच्या परीक्षेत 81  टक्के गुण  मिळाल्याचे समजले. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.