इयत्ता दहावीच्या निकालाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ही परीक्षा मार्च एप्रिलमध्ये घेण्यात आली होती. बारावी परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला आहे. तर, इयत्ता दहावीचा निकाल १७ जून दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. तशी घोषणा गायकवाड यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
online result -