सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (08:34 IST)

काँग्रेसने केले सुधीर तांबें यांचे तात्पुरते निलंबन

facebook
नाशिक पदवीधर मतदारसंघा मध्ये काँग्रेसने सुधीर तांबे यांची उमेदवार म्हणून निवड केली होती. असे असतानाही त्यांनी पक्षाचा निर्णय डावलून स्वतःचा मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवार म्हणून फॉर्म भरला. तोही अपक्ष म्हणून फॉर्म भरल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. यावरून आता काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांचे तात्पुरते निलंबन केले आहे. विशेष म्हणजे, पक्षाने काढलेल्या पत्रामध्ये असे म्हंटले आहे की, चौकशी होईपर्यंत सुधीर तांबे यांना निलंबित करण्यात येत आहे. या पत्रामध्ये कुठेही सत्यजित तांबे यांचा उल्लेख नाही.
 
काँग्रेस पक्षाने केलेल्या कारवाईवर सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, "काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे." असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
दरम्यान, सत्यजित तांबे यांच्याबाबत पक्षाने कोणतेही कारवाईचे आदेश दिलेले नाहीत. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच, 'सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळणार नाही.' असे स्पष्ट केले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor