बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (08:03 IST)

केतकी चितळेच्या वयाचा विचार करता वॉर्निंग देऊन या गोष्टी थांबवाव्यात- पंकजा मुंडे

ketaki chitale
केतकीच्या वयाचा आणि आणि सगळ्या बाबींचा विचार करता तिला वॉर्निंग देऊन या गोष्टींना पूर्णविराम द्यायला हवं, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केतकीविरोधात कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं तसंच पवई आणि नाशिक सायबर पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं आहे.
 
एखाद्याने सोशल मीडियावर काय लिहावं हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असला तरी सर्वांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. टीकासुद्धा अशी करावी, ज्यात बीभत्सपणा नसावा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
 
आम्ही लहानपणापासून राजकारण पाहिलं आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, लोक पेपरमधून लिहायचे. तरीसुद्धा काहीवेळा भाषा घसरायची. आम्ही मुंडे साहेबांना तेव्हा विचारायचो की, हे कसं सहन करता? त्यावर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असं ते सांगायचे. पण आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या वेगळ्या पद्धतीने केली जात आहे, असं म्हणताना पंकजा यांनी केतकीच्या वयाचा विचार करून तिला वॉर्निंग देऊन या गोष्टी संपवाव्यात असं म्हटलं.
 
पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, असंही पंकजा यांनी यावेळी म्हटलं.