बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (07:40 IST)

आघाडीत बिघाडी : सेनेविरोधात काँग्रेस आक्रमक, न्यायालयात खेचण्याचा ईशारा

congress shivsena
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उघडपणे घमासान सुरु झाले आहे. मुंबई मनपाच्या निवडणुकीपुर्वी  जाहीर झालेल्या वॉर्ड रचनेवरुन काँग्रेसने न्यायालयात जाण्याचा ईशारा दिला आहे. शिवसेनेकडून मित्र पक्षाचे नुकसान होणार असेल तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
 
मुंबई (Mumbai) महानगर पालिकेसाठी प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानुसार आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार आहेत. या
 
नाना पटोले संतापले आहेत. त्यांनी म्हटलं की, आघाडीचं सरकार असताना सर्व पक्षांचा विचार कारायला हवा. राजकारणात धर्म आणू नये. आमची मागणी दोनच्या प्रभागाची होती. परंतु तीनचा प्रभाग करण्यात आला. महाविकास आघाडीतील काही पक्ष सोयीनुसार करणार असतील तर न्यायालयात जाऊ. पुण्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी कोर्टात गेलो आहोत. यामुळे मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन नाना पटोले शिवसेनेसोबत पंगा घेणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
 
मुंबईत 9 प्रभाग वाढले आहेत. त्यापैकी 3 प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात आहेत. शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये, पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत. वाढीव 9 वॉर्ड पैकी 6 वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत.
 
भाजपही विरोधात
 
भाजप नेते प्रसाद लाड यांनी वार्डरचनेवरुन शिवसेनेला घेरले आहे. कोणाचे नाव न घेता एका मंत्र्याने हे सर्व केलं आहे. 140 प्रभागांमध्ये शिवसेनेच्या सांगण्यावरून बदल केले आहेत. चुकीच्या प्रभाग रचनेबद्दल भाजप हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.