बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (13:39 IST)

पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद, पंपावर महिलांमध्ये हाणामारी, व्हिडीओ जोरदार व्हायरल

नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर महिलांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. नागपूरच्या मेडिकल चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडल्याने वाद झालं आणि हाणामारीच्या समजतं.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील एक महिला पंपावर पेट्रोल भरायला गेली असताना पेट्रोल भरत असताना तिच्या कपड्यांवर पेट्रोलचे काही थेंब उडाले. यामुळे त्या महिलने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि इतकेच नाही तर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
 
पेट्रोप पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचं बघून पंपावरील इतर महिला पुढे आल्या. त्यांनी मिळून संबंधित महिलेला मारहाण केली. दरम्यान पेट्रोल पंपावरील होत असलेल्या या हाणामरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
या व्हिडिओत इंडियन ऑईल पेट्रोल कंपनीच्या तीन महिला लाल रंगांचा ड्रेस घातलेल्या असून एका महिलेला भर रस्त्यात मारत असल्याचं दिसून येत आहे. घटनेच्या वेळी पंपावर इतरही नागरिक उपस्थित होते त्यांपैकी काहींनी मोबाइलमध्ये ही घटना कैद केली.