सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (12:50 IST)

दौऱ्याआधीच मनसेला धक्का!

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आता औरंगाबाद निवडणुकीआधी शिवसेनेने मनसेला मोठा धक्का दिला आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील आठवड्यापासून औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच शिवसेनेने मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मनसेचे अनेक पदाधिकारी फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
मनसेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आहे. आता स्वत: राज ठाकरे औरंगाबादमध्ये लक्ष घालत असल्याने आता मनसे यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.