शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (10:09 IST)

'खालच्या वर्गातील मुली शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करतात, मुलंही सुंदर नसतात', आमदाराच्या वक्तव्यावरुन वाद

Devendra Bhuyar
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या 2024 दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एका सभेत सांगितले की, शेतकऱ्याच्या मुलाला कमी सुंदर वधू मिळते. आमदार इथेच थांबले नाही. तर मुलींमध्ये नंबर वन, नंबर टू आणि नंबर थ्री या कॅटेगरीही त्यांनी सांगितल्या. भुयार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. 
 
मिळतेय माहितीनुसार आमदार देवेंद्र भुयार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठकीत बोलत होते. यादरम्यान ते  म्हणाला की जर मुलगी सुंदर असेल तर तिला तुमच्या-माझ्यासारखी व्यक्ती आवडणार नाही, पण नोकरी करणारी व्यक्ती तिला आवडेल. तसेच ते म्हणाले की, ज्या मुली दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे कमी सुंदर असलेल्या, किराणा दुकाने किंवा पान दुकान चालवणाऱ्या लोकांना आवडतात. व तीन नंबरच्या मुली शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करतात, असे आमदार म्हणाले.
 
तसेच आमदार देवेंद्र भुयार इथेच थांबले नाही. तर म्हणाले की, शेतकरी कुटुंबातील मुलांशी फक्त खालच्या दर्जाच्या मुलीच लग्न करतात. अशा विवाहातून जन्माला येणारी मुलेही सुंदर नसतात. देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला असून विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.

Edited By- Dhanashri Naik