शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 21 एप्रिल 2021 (18:04 IST)

भायखळा कारागृहात कोरोनाचा कहर; इंद्राणी मुखर्जीसह ३८ महिला कैदी बाधित

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा रोज नवा उच्चांक समोर येत आहे. सोबतच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनानं आता कारागृहातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भायखळा कारागृहातही आता कोरोनाचा विस्फोट झाल्याचं समोर आलं आहे. या तुरुंगात एकाच दिवसात ३८ महिला कैदी कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं आहे. यात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
 
एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर कारागृहातील कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचंही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे, तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. याआधीही कोल्हापूर कारागृहात १० दिवसांपूर्वी एकाच वेळी २८ कोरोना रुग्ण आढळले होते.