बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (15:55 IST)

दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची कोरोना चाचणी, टोपे यांची माहिती

ओमायक्रॉन विषाणूमुळे जगात चिंता वाढली असून भारतातही दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर ओमायक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा पादुर्भाव वाढू नये यासाटी राज्य सरकारकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
 
राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ओमायक्रॉन रुग्ण संसर्गजन्य असला तरीही तो धोकादायक नसल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात ओमायक्रॉन विषाणूचे ५४ रुग्ण असून राज्यात दररोच दीड ते दोन लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच येत्या १५ ते २० दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के लसीकरण होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालनामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
महाराष्ट्रात ओमायक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मराष्ट्रात ओमायक्रॉनच्या ५४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ५४ ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.