1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (21:00 IST)

म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश

Hence order to increase corona tests in Nashik district
अहमदनगरमधील वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता नाशिककरांना भेडसावते आहे. नगरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ते पाहता नाशिकमध्ये लक्ष ठेवावे. येथे कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या आहेत. 
 
कुंटे यांनी नाशिक, नगर, पुणे, ठाणे, सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या अहमदनगरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सध्या रुग्णवाढीमुळे हॉटस्पॉट ठरत आहे. सिन्नर आणि नगरची सीमारेषा जवळ आहे. यामुळे या भागात रुग्ण वाढत असल्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षा घेता नाशिक जिल्ह्यामध्ये चाचण्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या 980 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत देण्यात आली. जिल्ह्यातील 3 लाख 97 हजार 612 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.