1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (16:08 IST)

कोणताही चमत्कार होऊ शकतो : राधाकृष्ण विखे-पाटील

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तसेच कोणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे कोणताही चमत्कार होऊ शकतो,असे सूचक वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. 
 
अहमदनगरयेथे एका महाविद्यालयातील विस्तारीत इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधली आहे,त्याला कोणताही वैचारिक आधार नाही.सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत.सत्ता नसतानाही भाजप-शिवसेना २५-२५  वर्षे एकत्र काम करत होती.त्यामुळे भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.