मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो… या चर्चा आतमध्ये. त्या बाहेर कशाला सांगायच?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास संजय राऊत यांनी नकार दिला.मुख्यमंत्र्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गणेशोत्सव सुरू आहे.उद्या विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं.थोड्यावेळ गप्पा मारल्या.गणपती सुद्धा राजकारण्यांचा गुरू आहे.राजकारण्यांनी गणपतीकडून अनेक गोष्टी शिकव्यात. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो या चर्चा आतमध्ये.त्या बाहेर कशाला सांगायच्या?,असं राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे तीन पक्षात पडसाद उमटले आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर पडसाद वगैरे काही नाही.सर्व काही शांत आहे.अलबेल आहे.कोणतंही वादळ नाही.कमालीची शांतता आहे.त्या विधानाने कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या.पण हे सरकार तीन वर्ष चालणार आहे,असं त्यांनी सांगितलं.उद्धव ठाकरे हे नुसतेच मुख्यमंत्री नाहीत.ते आमचे पक्षप्रमुख आहेत.तसेच ते माझे व्यक्तिगत मित्रंही आहेत.त्यामुळे आमच्यात गप्पा झाल्या.पक्षाच्या संदर्भातही चर्चा झाल्या.त्यांना वेळ असेल तेव्हा मी जाऊन भेटतो त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो,असंही त्यांनी सांगितलं.