गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

होळी थोडक्यात साजरी करा : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोना व्हायरस आणि सरकारी उपाययोजना यावर विधानसभेला संबोधून निवेदन सादर केलं. यावेळी, ‘आगामी होळीच्या उत्सवामध्ये राज्यातल्या नागरिकांनी थोडक्यात आनंद साजरा करून आवश्यकता नसेल, तर एकत्र जमणं टाळावं’, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला केलं आहे.
 
करोना व्हायरसचे देशात आत्तापर्यंत २९ रुग्ण आढळले असून त्यामध्ये महाराष्ट्रात अजूनपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, त्याआधीच महाराष्ट्रात करोना व्हायरस येऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासंदर्भात विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.  सध्या पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये करोनाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे.  भयभीत न होता आपल्याला या संकटाचा मुकाबला करायचा आहे. मास्कचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.