Corona Wave: बसेस होणार अँटी कोरोना
पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि राज्याचे आरोग्य विभाग पूर्व तयारी करत आहे. यासोबतच आता राज्य परिवहवन महामंडळ MSRTC सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून बसेसवर विशेष रसायनांची फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता एमएसआरटीसी मंडळ आपल्या जवळपास १० हजार बसेसवर अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग (Antimicrobial chemical layer) करण्यात येणार आहे.