शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (17:21 IST)

कोर्ट भडकले म्हणाले वनाधिकारयाला वनात पाठवू

court
महाराष्ट्रातील गड  प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. जनहित याचिका मिलिंद एकबोटे यांनी दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने तेथील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने एकबोटे यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली होती. यावर कोर्ट फार संतापले होते जर आदेश पाळत नसतात तर तुम्हाला वनात पाठवू का तुरुंगात खडी फोडायला [पाठवू असा सज्जड विचारणा केली आहे. निर्धारित वेळेत अतिक्रम काढा अन्यथा तुम्हाला शिक्षा अटल आहे असा दम न्यायलयाने दिला आहे.